नवी दिल्ली -जगाभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतामध्येही दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून आज ही संख्या 73 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकाराने कोरोना विषाणू हा महामारी रोग असल्याचे जाहीर केले आहे. हरियाणा आरोग्य मंत्रायाकडून यासंबधी परिपत्रक जारी केले आहे.
हरियाणा आरोग्य मंत्रायाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य मंत्री अनिल विज यांनी टि्वट करून कोरोना विषाणू हा महामारी रोग असल्याचे जाहीर केल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, हरियाणामध्ये एकाही भारतीय नागरिकाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे प्रकरण समोर आलेले नाही. मात्र, कोरोना बाधित 14 विदेशी नागरिक गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार घेत आहेत.
केंद्रीय स्तरावर आरोग्य मंत्री अनेक बैठका घेत असून परिस्थितीवर बारकाईने नियंत्रण ठेवत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता देशाचे आरोग्य मंत्रालय विशेष खबरदारी घेत आहे. भारत सरकारने परदेशी नागरिकांचे सर्व पारपत्र (व्हिजा) १५ एप्रिलपर्यंत रद्द केले असून देशाच्या सीमाही बंद केल्या आहेत.
राज्यनिहाय कोरोना बाधीत रुग्णाची आकडेवारी