नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानमध्ये ३ मे १९९९ ला कारगिल युद्ध सुरू झाले आणि २६ जुलै १९९९ मध्ये या युद्धात भारताने विजय मिळवला. भारत- पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मिरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरू होते. यावेळी भारतीय जवानांना भौगोलिक, वातावरण, उंच प्रदेशामुळे अनेक संकटांना सामना करावा लागला.
भौगोलिक कारणे -
- उंच पर्वत शिखरांची उंची १८ ते २१ हजार फूट असून दऱ्या १० ते ११ हजार फूट खोल आहेत. त्यामुळे सैनिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
- संपूर्ण परिसर किंवा त्यातील बहुतेक भाग तीक्ष्ण कडा आणि उंच शिखरांनी व्यापलेला असल्यामुळे प्रत्यक्ष युद्धावेळी आणि सुरक्षीततेसाठी अत्यंत कठीण कारगिल येथील भाग आहे.
- तेथील माती ही भुसभुशीत असल्यामुळे त्यावरून चालताना जवांनांना कोसळण्याची भीती होती. तसेच गोल दगड असल्यामुळे प्रत्यक्ष पर्वतावर चढाई करताना, ते निसटायचे.
- मे 1999 ला कारगिल युद्ध झाल्यामुळे उन्हाळ्यातील समस्यांना भारतीय लष्कराला तोंड द्यावे लागत होते. हिरवी झाडे नसल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता होती. त्यामुळे जवांनांना थकवा येत होता. परिणामी सैन्याच्या लढाऊ कार्यक्षमतेवरही गंभीर परिणाम होत असे.
वातावरणाचे आव्हान -
- हवेचे प्रमाण कमी, थंड हवामान, उंच आणि निसटता डोंगर ही मोठी आव्हाने भारतीय जवानांच्या पुढे होते.
- उंचावरचा प्रदेश असल्यामुळे त्या भागात तापमान फार कमी होते. 100 मीटर उंच गेलं की तापमान 1 सेल्सिअसने कमी होत असे.
- उंच आणि कमी तापमानाच्या प्रदेशामुळे जखम झाली असेल तर वैद्यकीय मदत मिळणे अशक्य होते.
- 1999 मध्ये कारगिल प्रदेशात उणे 30 डीग्री सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यामुळे सैनिकांना थंडीचाही सामना करावा लागत होता.
- लढाई होत असलेल्या ठिकाण खूप असल्यामुळे तेथे वाऱ्याचा वेग जास्त होता. याही संकटाला जवानांना तोंड द्यावा लागत होते.
- ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यामुळे सैनिकांच्या श्वसनाचा त्रास जाणवत होता. तसेच युद्धाची मानसिक तयारीवरही परिणाम झाला.
- कारगिल भागातील वातावरण हे सामान्य नसल्यामुळे सैनिकांच्या युद्धाची मोहिम पूर्ण करण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होत असे. तसेच वातावरणातील कमी दाबामुळे हवाई दलाला कार्यरत करण्यातही अडचणी येत होत्या.
उंचावरील भाग असल्यामुळे विविध आजाराची शक्यता -
- 5 हजार फूट उंचावरील भागात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यामुळे 'अक्यूट माऊंटेन सिकनेस' (एएमएस) या आजाराला सैनिक बळी पडत होते.
- 8 हजार फूट उंचावर ( 2438 मीटर) गेलं तर सैनिकांना पल्मोनरी एडेमा आणि सेरेब्रल एडेमा सारख्या आजारांना तोंड द्यावे लागत होते.