दिल्ली - देशात कोरोनाचे सावट गडद होत असताना दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ येथे मुसलमान समुदायाची सभा झाली. सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा करत आयोजित केलेल्या या सभेत अनेक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यानंतर संबंधित प्रकरणावर राजकीय नेत्याचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
तबलिगी जमातीला भारतात बंदी घाला; शिया वक्फ बोर्डाची मागणी - shia waqf board news
देशात कोरोनाचे सावट गडद होत असताना दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ येथे मुसलमान समुदायाची सभा झाली. सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा करत आयोजित केलेल्या या सभेत अनेक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
निजामुद्दीन मरकझ येथे मोठ्या प्रमाणात जमलेल्या मुसलमान समुदायाच्या विरोधात शिया वक्फ बोर्डाचे संचालक वसीम रिझवी यांनी हल्लाबोल केलाय. हा समाज देशाचा शत्रू असून त्यांना भारतात बंदी घातली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच तबलिगी ही इस्लाम धर्मातील सर्वाधिक खतरनाक जमात असून ती अतेरिकी कारवायांसाठी तरुणांना चूकीचे धर्मज्ञान देत असल्याचे त्यांनी म्हटले.
कोरोनासारखी महामारी संपूर्ण भारतात पसरवायचा या समुदायाचा हेतू असून त्यांचे हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे, अशी मागणी शिया वक्फ बोर्डाने केली आहे.