नवी दिल्ली -दिल्लीच्या नांगलोई भागात घरी जात असलेल्या मायलेकींवर दोन साखळी चोरांनी हल्ला केला. मात्र, या महिलेने हिंमत दाखवत, सोनसाखळी ओढून पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या चोरांना पकडून ठेवले. यावेळी लगेच आजूबाजूच्या लोकांनी मदतीला येत या चोरांना धडा शिकवला.
अन् महिलेने चालत्या दुचाकीवरून चोराला ओढून पाडले; सोनसाखळी चोराला घडली अद्दल - मायलेकींनी कसा शिकवला सोनसाखळी चोरांना धडा
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून तिथून पोबारा करण्याचा प्रयत्न करत असताना, चोरांची गाडी सुरुच झाली नाही. हीच संधी पाहून महिलेने चपळता आणि हिंमत दाखवत चोरांना पकडून ठेवले. त्यानंतर, आसपासच्या लोकांनी पुढे येत चोरांना चांगलाच चोप दिला.
![अन् महिलेने चालत्या दुचाकीवरून चोराला ओढून पाडले; सोनसाखळी चोराला घडली अद्दल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4337466-thumbnail-3x2-delhi.jpg)
ही महिला आपल्या मुलीसह रिक्षामधून उतरून रस्ता ओलांडत होती. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन साखळी चोरांनी त्यांचा रस्ता अडवत, महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून घेतली. त्यानंतर तिथून पोबारा करण्याचा प्रयत्न करत असताना, चोरांची गाडी सुरुच झाली नाही. हीच संधी पाहून महिलेने चपळता आणि हिंमत दाखवत चोरांना पकडून ठेवले. त्यानंतर, आसपासच्या लोकांनी पुढे येत चोरांना चांगलाच चोप दिला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हेही वाचा : काश्मीरच्या आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू, परिसरात तणाव