कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर पश्चिम बंगालमध्ये सांप्रदायिक विवाद भडकवण्याचा आरोप केला आहे. तसेच, यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केंद्र-भाजपकडून बंगालमध्ये सांप्रदायिक विवाद भडकवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर - ममता बॅनर्जी - west bengal
'बंगालमध्ये बांग्लादेशातून घुसखोरी होत असल्याचे भाजप म्हणत आहे. मात्र, सर्व अल्पसंख्य बांग्लादेशातूनच येतात का? एखादी बांग्लादेशी व्यक्ती भाजप प्रवेश करत असेल तर, ही बाब मात्र खपवून घेतली जाते,' असे हल्ला ममता यांनी केला.
'सोशल मीडियाचा वापर करून केंद्र सरकार आणि भाजप पश्चिम बंगालमध्ये सांप्रदायिक विवाद भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सरकार करो़डो रुपये खर्च करत आहे. त्यांनी आगीशी खेळू नये, अशी चेतावणी मी त्यांना देत आहे,' असे ममता यांनी म्हटले आहे. 'आम्ही भाषणे ऐकण्यासाठी दिल्लीला जाणार नाही. त्यापेक्षा आमच्या संस्था मजबूत करण्यावर भर देणार आहोत. मी पोलिसांना अधिक सामर्थ्यशाली बनण्यास सांगितले आहे,' असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
ममता यांनी बांग्लादेशी अभिनेत्री अंजू घोष यांना भाजपमध्ये घेण्यावरून भाजपवर हल्ला चढवला. 'बंगालमध्ये बांग्लादेशातून घुसखोरी होत असल्याचे भाजप म्हणत आहे. मात्र, सर्व अल्पसंख्य बांग्लादेशातूनच येतात का? एखादी बांग्लादेशी व्यक्ती भाजप प्रवेश करत असेल तर, ही बाब मात्र खपवून घेतली जाते,' असा हल्लाबोल ममता यांनी केला. तसेच, ममता यांनी नितीश कुमार यांच्या बिहारच्या बाहेर भाजपशी युती न करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.