नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. देशात लॉकडाऊन असल्यामुळे मनोरंजन उद्योगाला जबरदस्त आर्थिक फटका बसला. या प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी आज सरकारने दिशानिर्देश जारी केले आहेत. सरकारने मालिका व चित्रपटांच्या शुटिंगसाठी परवानगी दिल्याचं केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सांगितले. शुटिंगदरम्यान, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
मालिका अन् चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी परवानगी; 'या' नियमांचे करावे पालन - प्रकाश जावडेकर
देशात लॉकडाऊन असल्यामुळे मनोरंजन उद्योगाला जबरदस्त आर्थिक फटका बसला. या प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी आज सरकारने दिशानिर्देश जारी केले आहेत. सरकारने मालिका व चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सांगितले.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर
'मला घोषणा करताना आनंद होत आहे की, मालिका व चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी सरकारने नवी कृती मानके (एसओपी) जारी केले आहेत. मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण आता पुन्हा सुरू केले जाऊ शकते', असे टि्वट प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. ज्या लोकांचे रेकॉर्डींग केले जाते, फक्त तेवढी लोक सोडून इतर सर्वांनी सोशल डिस्टन्स ठेवणे आणि मास्क घालणे अनिवार्य आहे. शुटिंगच्या ठिकाणी स्वच्छता, गर्दी नियोजन, सुरक्षात्मक उपकरणे असणे गरजचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
या नियमांचे पालन करावे -
- मास्क घालणे अनिवार्य असून कार्यस्थळी प्रवेश करताना थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी.
- चित्रीकरणाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे आणि हात स्वच्छ ठेवण्यासाठी सॅनिटायझरचा ठेवणे.
- कुठेही थुंकू नये, तसेच आरोग्य सेतू अॅप वापरावे.
- संभव असेल तेवढ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे.
- सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, म्हणून कार्यस्थळी उचीत अंतरावर गोलाकार काढणे.
- कार्यस्थळी कोरोना नियमांचे पोस्टर्स लावावे.
- जर कोणी संक्रमित आढळल्यास संपूर्ण परिसर संक्रमणमुक्त करावा, संबधित व्यक्तीच्या साथीदारासही आसोलेशनमध्ये ठेवावे.
- चित्रीकरणादरम्यान, कमीत-कमी लोकांची उपस्थिती असावी.