नवी दिल्ली - केंद्र सरकारने राज्यांना जीएसटी भरपाई म्हणून रक्कम दिली आहे. ही रक्कम एकूण ३६,४०० कोटी रुपये एवढी आहे. डिसेंबर 20१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून ही रक्कम देण्यात आली आहे.
कोरोना महामारीमुळे सध्या राज्य सरकारांना जादाचा खर्च करावा लागत आहे. तसेच, त्यांना मिळणाऱ्या महसूलाचा बराचसा भाग बंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने जीएसटी भरपाईसाठी एकूण ३६,४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले होते.