नवी दिल्ली - गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात एका दिवसाचा (१८ मार्च) राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्याने सोमवारी केंद्र व राज्य सरकारचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सोबतच या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल. पर्रीकर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ते गोव्याचे मुख्यमंत्री हा प्रवास मोठा आहे. केंद्रातील संरक्षण मंत्रालयाचा पदभारही पर्रीकर यांना काही काळ सांभाळला. यानंतर त्यांना पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी गोव्यात पाठविण्यात आले होते.