अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून यांचे तोंड बंदच - प्रियांका गांधी
मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कारभारावर काँग्रेसकडून व्हिडिओ बनवण्यात आला आहे. '१००डेज नो विकास' या हॅशटॅगखाली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे.
नवी दिल्ली- देशभरात सध्या असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून हे सरकार काही झालेच नाही या अविर्भावात तोंड उघडण्यास तयार नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.
ट्विटरवरून त्यांनी हिंदी भाषेत कवितेद्वारे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. 'अर्थव्यवस्था करके चौपट, मौन बैठी है सरकार, संकट में हैं कम्पनियाँ, ठप्प हो रहा व्यापार, ड्रामे से, छल से, झूठ से, प्रचार से करके कपट, जन-जन से छुपा रहे देश की हालत विकट', अशी कविता त्यांनी केली आहे. देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असताना हे सरकार लोकांपासून ही गोष्ट लपवत असल्याचे त्यांनी कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.