नवी दिल्ली - केंद्र सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री येथून पुढे 18 वर्षाच्या व्यक्तीला करता येणार नसून ती 21 वर्षांवरील व्यक्तीलाच करता येईल, याबाबतचे विधेयक तयार केले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास 21 वर्षांखालील व्यक्तीने सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करणे आणि ते वापरणे अवैध ठरेल.
सरकारने सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ (व्यापार व वाणिज्य, उत्पादन, पुरवठा, वितरण, जाहिरात व नियमन) दुरुस्ती कायदा, 2020 तयार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या नव्या विधेयकाचा एक भाग म्हणजे वयोमर्यादा 21 वर्षे करण्याची तरतूद आहे. या विधेयकात सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ (व्यापार व वाणिज्य प्रतिबंध, उत्पादन व पुरवठा व वितरण) अधिनियम, 2003 मध्ये सुधारणा करण्याचा विचार केला आहे.
विधेयकात प्रस्तावित केलेल्या दुरुस्तींनुसार, कोणात्याही 21 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला सिगारेट किंवा इतर तंबाखूजन्य वस्तू विकण्याची किंवा विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. यासह कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, अशीही तरतूद आहे.
हेही वाचा -नवीन वर्षाच्या उत्सवाच्या वेळी होंडुरासमध्ये 18 ठार