महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदी सरकारविरोधात कामगार संघटनांचे देशव्यापी आंदोलन

protest
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात कामगार संघटनांचे आंदोलन सुरू; पाहा LIVE अपडेट्स..

By

Published : Nov 26, 2020, 8:18 AM IST

Updated : Nov 26, 2020, 10:46 PM IST

15:20 November 26

कामगार कायद्यांविरोधात कोल्हापुरात आंदोलन

कोल्हापूरात कामगार कायद्यांविरोधी आंदोलन

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात गुरुवारी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात कोल्हापूरातूनही हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. 'टाऊन हॉल' येथील गार्डनमध्ये एकत्र येत कामगारांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. अनेक कामगारांबरोबरच येथील खासगी परिचारिका संघटना, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स मोठ्या संख्येने संपामध्ये सहभागी झाल्या होत्या.    

15:13 November 26

केंद्राच्या कामगार आणि कृषी कायद्यांविरोधात महिला कर्मचाऱ्यांचे सांगलीत आंदोलन

सांगलीत महिला कर्मचाऱ्यांचे आंदोलन

कृषी व कामगार कायद्यांविरोधात करण्यात आलेल्या संपामध्ये सांगली जिल्ह्यातील अनेक  कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. आशा, गटप्रवर्तक महिला व विविध डाव्या संघटनांनी सांगलीमध्ये एकत्र येत आंदोलन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत केंद्र सरकारने मंजूर केलेले कामगार आणि कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.  

14:10 November 26

केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये कामगार संघटनांची निदर्शने

केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये कामगार संघटनांची निदर्शने

केरळ: केंद्राच्या नवीन कामगार व शेत कायद्याच्या विरोधात आज 12 कामगार संघटनांनी तिरुअनंतपुरममध्ये निदर्शने केली. 


 

13:29 November 26

नाशकात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

नाशिक - कामगार कायद्यात बदल करण्यात यावे, या मागणीसाठी शहरात निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी कामबंद करत देशव्यापी आंदोलनात सहभाग घेतला. 

13:10 November 26

केरळच्या कोचीत कामगार मानवी साखळी करून संपात सहभागी

केरळ: भारतीय कामगार संघटना (सीआयटीयू) च्या कामगारांनी केंद्राच्या नवीन कामगार व कृषी कायद्यांच्या विरोधात आज देशव्यापी संपाचा एक भाग म्हणून कोची येथे मानवी साखळी बनवली.

13:05 November 26

बुलडाण्यात पोलिसांनी बंद पाडले आंदोलन

बुलडाणा -राज्यातील विविध संघटनांच्यावतीने आज विविध मागण्यांसाठी संपची हाक दिली आहे. या संपामध्ये बुलडाण्यातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभागी घेत जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निर्दशने केली. मात्र, पोलिसांनी परवानगी नसल्याचे कारण देत सुरू असलेल्या आंदोनाला बंद पाडले व कर्मचाऱ्यांना जमाव करण्यास बंदी घातली. यामुळे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेला आपला आंदोलन गुंडाळत घ्यावा लागले. 

13:04 November 26

रत्नागिरीतही राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने

रत्नागिरीतही राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने सुरू आहेत. जिल्ह्यातील जवळपास 650 कर्मचारी या संपात सहभागी झाले असून संप पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे.

13:03 November 26

पालघरमध्ये कम्युनिस्ट पक्ष आणि कष्टकरी संघटनेचा रास्ता रोको

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर मधील आंबोली येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कष्टकरी संघटनेमार्फत रास्ता रोको करण्यात आला आहे. मागील वीस ते पंचवीस मिनिटांपासून कार्यकर्त्यांनी हा महामार्ग रोखून धरला असून यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे .

12:52 November 26

येवल्यात बांधकाम व माथाडी कामगारांचा देशव्यापी संपात सहभाग

येवल्यात बांधकाम व माथाडी कामगारांचा देशव्यापी संपात सहभाग

नाशिकच्या येवल्यात सीटु संलग्न माथाडी कामगार तसेच बांधकाम कामगारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन केले. बांधकाम कामगारांना पेन्शन लागू व्हावी, घरकुल मिळावे, कोरोनामुळे नुकसान झालेल्या ट्रान्सपोर्ट व माथाडी कामगारांना 10 हजार आर्थिक साहाय्य द्यावे, शेती विषयक व कामगार विषयक कायदे मागे घ्यावे, 

12:50 November 26

अकोल्यात इंटकसह, सरकारी, निमसरकारी कर्मचारी आंदोलनात सहभागी

अकोला - विविध आणि प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी इंटक, सरकारी कर्मचारी, निमसरकारी आणि कामगार संघटना सोबतच बँक कर्मचारी संघटना एकत्र आल्यात. या सर्व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच देशव्यापी संपात आपला सहभाग नोंदविला. देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना सहभागी होवुन विविध मागण्यांसाठी आपला असंतोष व्यक्त केला. शासनाचे लक्ष वेधन्यासाठी व मागण्यांची सोडवणुक करण्यासाठी दिर्घ काळापासुन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित राहिलेल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.  

12:15 November 26

मुंबईतील कर्मचारी काम करून संपाला पाठिंबा देणार

मुंबई - देशभरात कामागर विरोधी कायद्याविरोधात कामगार कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी प्रकट करण्यासाठी आज कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. मुंबईत कोरोनाची परिस्थिती असल्याने महापालिका कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येत असल्याने संपात सहभागी होणार नाहीत. मात्र, काम करून संपाला पाठिंबा देतील, असे मुंबई मनपा कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीकडून सांगण्यात आले आहे. 

11:53 November 26

शासकीय कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यास कारवाई होणार

शासकीय कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यास कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. 

09:43 November 26

पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षांनी रेल्वे रोखली

पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षांनी रेल्वे रोखली

पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षांनी जादवपूर येथे रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी - लेनिनिस्ट) लिबरेशन, माकप आणि कॉंग्रेस सदस्यांनी रेल्वे रोखली. 

09:40 November 26

ओडीशाच्या भुवनेश्वरमध्ये पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग

ओडीशाच्या भुवनेश्वरमध्ये पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग

ओडीशा निर्माण श्रमिक फेडरेशन आणि ऑल इंडिया सेंट्रल काऊंसिल ऑफ ट्रेड युनियन्स तसेच ओडीशातील सर्व पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी आजच्या देशव्यापी आंदोलनात सहभाग घेतला आहे. 

09:12 November 26

केरळच्या कोचीत बससेवा आणि बाजारपेठा बंद

केरळच्या कोचीत बससेवा आणि बाजारपेठा बंद

केरळच्या कोचीमध्ये बससेवा आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आला आहे. येथील कामगार संघटना आजच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. 

08:04 November 26

पश्चिमबंगालमध्ये कामगार आंदोलकांचा रेल रोको..

पश्चिमबंगालमध्ये कामगार आंदोलकांचा रेल रोको..

पश्चिम बंगालच्या बेलघारिया रेल्वेस्थानकावर डाव्या कामगार संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी रेल रोको केला आहे.

07:32 November 26

मोदी सरकारविरोधात कामगार संघटनांचे देशव्यापी आंदोलन

सेंट्रल ट्रेड युनियनच्या एकदिवसीय संपात बँक कर्मचारी संघटना आज सहभागी होणार आहेत. त्यामुळे देशभरातील बँकिंग सेवा बंद राहतील. सेंट्रल ट्रेड युनियनने नवीन तीन कामगार कायद्याविरोधात गुरुवारी संप पुकारला आहे. बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आयडीबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्राने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफसर्स असोसिएशन (एआयबीओए) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) या संघटना संपात सहभागी होणार आहेत.

Last Updated : Nov 26, 2020, 10:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details