बेळगाव - जोरदार पावसामुळे मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर आणि वांगणी दरम्यान अडकून पडली आहे. 13 तासांपासून 700 प्रवासी रेल्वेमध्ये अडकले होते. सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश अंगादी यांनी याबाबत माहिती दिली.
महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवासी सुखरुप; लवकरच गावी पाठवणार - रेल्वेमंत्री सुरेश अंगादी - बदलापूर
सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. सर्व प्रवाशांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश अंगादी यांनी दिली आहे.
'ईटीव्ही भारत'शी बोलताना सुरेश अंगादी म्हणाले, काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात अडकून पडली होती. देवाच्या कृपेने रेल्वेतील कोणालाही इजा झाली नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 700 लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. मी अधिकारी, एनडीआरएफ आणि डॉक्टरांच्या पथकाचे अभिनंदन करतो. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. सर्व प्रवाशांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे पोलीस, शहर पोलीस आणि एनडीआरएफ तुकड्यांनी परिश्रम घेतले. यासोबच भारतीय वायू दलाचे हेलिकॉप्टर आणि नौदलाचे पथकही मदतीसाठी आले होते. महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकेलल्या सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. रेल्वे भोवती मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून प्रवाशांना बाहेर येताना अडचणीत येत होत्या. सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांची सह्याद्री मंगल कार्यालय, बदलापूर येथे व्यवस्था करण्यात आली आहे.