महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले - ravi shankar prasad escaped from helicopter accident

केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद हेलिकॉप्टर अपघातातून आज(शनिवार) थोडक्यात बचावले.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

By

Published : Oct 17, 2020, 8:11 PM IST

Updated : Oct 17, 2020, 9:13 PM IST

पाटणा - केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद हेलिकॉप्टर अपघातातून आज(शनिवार) थोडक्यात बचावले. ते प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचा पंखा तारांना लागल्याने अपघात झाला. रविशंकर प्रसाद यांच्यासोबत बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे हे देखील होते. दोन्ही नेते सुरक्षित आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रविशंकर प्रसाद बिहारला आले असता पाटणा विमानतळावर त्यांच्या हॅलिकॉप्टरचा पंखा तारेला लागला. त्यामुळे पंखा तुटला. या अपघातातून दोन्ही नेते थोडक्यात बचावले. दोघेही सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

Last Updated : Oct 17, 2020, 9:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details