भुवनेश्वर -केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज प्लाझ्मा दान केला आहे. प्रधान यांना कोरोनाची लागण झाली होती. ते आता कोरोनातून बरे झाले असून त्यांनी इतर कोरोना रुग्णांच्या सोईच्यादृष्टीने प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला.
कटकच्या एससीबी मेडिकल महाविद्यालय वैद्यकीय रुग्णालयात जाऊन त्यांनी आपला प्लाझ्मा दिला. प्लाझ्मा दान केल्यानंतर प्रधान यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. प्लाझ्मा दान केल्यानंतर मला आनंद होत आहे. कोरोनाशी झुंझ देत असलेल्यांसाठी याचा उपयोग होईल, असे त्यांनी म्हटले आहे. कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्याची विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे.