नवी दिल्ली - मारहाण केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यामुळे राज्यातील आरोग्यसेवा खंडित झाल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आहे.
डॉक्टरांच्या संपाबाबत गृह मंत्रालयाने ममता सरकारकडे मागितला अहवाल - मारहाण
राज्यातील आरोग्यसेवा खंडित झाल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आहे.
![डॉक्टरांच्या संपाबाबत गृह मंत्रालयाने ममता सरकारकडे मागितला अहवाल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3568713-thumbnail-3x2-mmataaa.jpg)
डॉक्टरांच्या संपाचा परिणाम पूर्ण देशावर पडत आहे. संपात पश्चिम बंगाल व्यतिरिक्त इतर राज्येही सामिल झाली आहेत. त्यामुळे पूर्ण देशावर याचा फरक पडत आहे. त्यामुळे या परिस्थितीवर लवकरात लवकर अहवाल सादर करावा यासाठी गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारला कळवले आहे. गृहमंत्रालयाने यासाठी डॉक्टर, आरोग्य तज्ञ आणि मेडिकल संघटना यांच्यासोबत चर्चा केली आहे.
याव्यतिरिक्त गृहमंत्रालयाने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचाराबद्दलही माहिती मागवली आहे. हिंसाचाराविरोधात कोणती पाऊले उचलली आणि काय कारवाई केली याचाही अहवाल मागितला आहे.