महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गृहमंत्री अमित शाह काश्मीर दौऱ्यावर; हुतात्मा पोलीस जवानाच्या कुटुंबियाची घेतली भेट - अनंतनाग

अमित शाह यांनी बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विशेषत्वाने पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरची परिस्थिती जाणून घेतली. याचबरोबर १ जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसंबंधी सुरक्षा व्यवस्थेची चौकशी शाह यांनी केली.

अमित शाहांची काश्मीर सुरक्षासंबंधी बैठक

By

Published : Jun 27, 2019, 1:18 PM IST

श्रीनगर - केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर अमित शाह प्रथमच जम्मू-काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. या २ दिवसीय दौऱ्यात अमित शाह राज्यातील सुरक्षेचा आढावा घेणार आहेत.

अमित शाह यांनी काश्मीर दौऱ्यात सुरक्षेसबंधी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. शाह यांनी बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विशेषत्वाने पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरची परिस्थिती जाणून घेतली. याचबरोबर त्यांनी १ जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसंबंधी सुरक्षा व्यवस्थेचीही चौकशी केली. बैठकीला विविध सुरक्षा दलांचे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. राज्यपाल सत्यपाल मलिक, राजीव गौबा, राज्य सरचिटणीस बी.वी.आर सुब्रमण्यम, लेफ्टनंट रणबीर सिंग, डीजीपी दिलबाग सिंग यावेळी उपस्थित होते.

अमित शाहांंनी घेतली हुतात्मा पोलीस जवानाच्या कुटुंबियाची घेतली भेट

अमित शाह यांनी हुतात्मा पोलीस जवान अरशद खान यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. श्रीनगर येथे असलेल्या खान यांच्या घरी जाऊन शाह यांनी भेट घेतली. हुतात्मा अरशद खान यांचा अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता.

दहशतवादी संघटनांची काश्मीर बंदची हाक

अमित शाहंच्या २ दिवसीय दौऱ्यापूर्वी काश्मीरमधील दहशतवादी संघटनांनी २ दिवसीय काश्मीर बंदची हाक दिली आहे. याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असून काश्मीरमधील काही ठिकाणी शाह यांच्या दौऱ्यानिमित्त बंद पाळण्यात आला आहे.

राज्यपालांनी प्रोटोकॉल मोडून केले शाहंचे स्वागत

अमित शाह यांच्या स्वागतासाठी स्वत: राज्यपाल सत्यपाल नाईक प्रोटोकॉल मोडत राज्यातील अधिकाऱ्यांसह उपस्थित होते. याआधी राज्यपाल फक्त पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित राहत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details