महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊन वाढविण्यावर केंद्र सरकारचे विचार मंथन

25 मार्चपासून देशभरामध्ये 21 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, हा कालावधी पुरेसा नसून संचारबंदी वाढविण्यात यावी असे अनेक राज्य सरकारांचे म्हणणे आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 7, 2020, 11:28 PM IST

नवी दिल्ली - अनेक राज्य सरकारांनी आणि तज्ज्ञांनी 14 एप्रिलनंतर संचारबंदी वाढविण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. केंद्र सरकारही या दिशेने विचार करत आहे, अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.

मात्र, यावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. 25 मार्चपासून देशभरामध्ये 21 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, हा कालावधी पुरेसा नसून संचारबंदी वाढविण्यात यावी असे अनेक राज्य सरकारांचे म्हणणे आहे. तेलंगणा सरकारने 2 आठवड्यांचा लॉकडाऊन वाढण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

14 तारखेनंतरही संचारबंदी वाढविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी पत्रक जारी करून लॉकडाऊन वाढविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अनेक राज्ये लॉकडाऊन वाढवावा अशी सूचना करत आहेत. चर्चेनंतर यावर निर्णय घेतला जाईल, असे कॅबिनेट सचिवांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी दिली.

कोरोनामुळे आत्तापर्यंत 183 देशांमध्ये 75 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 13 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतामध्येही 4 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 117 जणांचा मृत्यू झाला आहे.

विविध राज्यातील परिस्थिती

  • पंजाबमध्ये 8 नवे रुग्ण आढळून आले असून एकून कोरोनाग्रस्तांची संख्या 99 झाली आहे.
  • हरियाणात 33 नवे रुग्ण आढळून आले असून एकून कोरोनाग्रस्तांची संख्या 129
  • उत्तरप्रदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या 324 झाली असून आज 16 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
  • केरळ राज्यात आज 9 रुग्ण आढळून आले.
  • तामिळनाडूत 69 आणखी कोरोना पॉझिटिव्ह, एकून रुग्ण 690
  • पश्चिम बंगालमध्ये 8 नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 69
  • महाराष्ट्रात 150 नवे रुग्ण, तर एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 18
  • राजस्थानात 15 नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 343
  • आंध्रप्रदेश 10 नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 314
  • मध्यप्रदेश 21 नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा 83
  • दिल्लीत 25 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 550
  • तेलंगणात 40 नवे रुग्ण, एकूण संख्या 348
  • गोवा राज्यात 7 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.
  • जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश 125 रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details