महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांमध्ये समन्वयासाठी हेल्पलाईन नंबर - Coronavirus vaccines and treatment

भारतामध्ये आत्तापर्यंत 873 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 47 परदेशी रुग्णांचा समावेश आहे. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संग्रहित छायाचित्र
कोरोना संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 28, 2020, 5:32 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये 850 पेक्षा जास्त नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून देशातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांमध्ये समन्वय रहावा म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. त्यामुळे सर्व डॉक्टरांना आता रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करावे, यावर चर्चा करता येणार आहे.

'COVID19 नॅशनल टेलीकन्सलटींग सेंटर'ची स्थापन करण्यात आली आहे. रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना माहितीची देवाणघेवाण करणे यामुळे सोपे होणार आहे. 9115444155 हेल्पलाईन क्रमांक आरोग्य मंत्रालयाने जारी केला आहे.

भारतामध्ये आत्तापर्यंत 873 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 47 परदेशी रुग्णांचा समावेश आहे. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर अजून लस किंवा औषध नसल्याने मलेरिया आणि इतर श्वसनासंबधींच्या आजाराची औषधे कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येत आहेत. त्यामुळे या हेल्पलाईनद्वारे डॉक्टरांना कशा पद्धतीने उपचार करावे, याबाबतची माहितीची देवाण-घेवाण करता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details