महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 13, 2020, 10:14 AM IST

ETV Bharat / bharat

कोरोना: केंद्र सरकारने नागरिकांच्या मदतीसाठी जारी केले हेल्पलाईन नंबर

१५ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठीही मदत क्रमांक जारी केले आहे. कोरोना संबधी कोणतीही माहिती हवी असेल तर महाराष्ट्रातील नागरिक ०२० - २६१२७३९४ या नंबरवर संपर्क साधू शकतात.

हेल्पलाईन नंबर
हेल्पलाईन नंबर

नवी दिल्ली - केंद्र सरकराने कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता सर्व राज्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. या नंबरवरुन नागरिकांना कोणत्याही मदतीसाठी फोन करता येणार आहे. ०११ - २३९७८०४६ हा क्रमांक केंद्र सरकारने जारी केला आहे. तर महाराष्ट्रातील नागरिक ०२० - २६१२७३९४ या नंबरवर संपर्क साधू शकतात. याबरोबरच १५ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठीही मदत क्रमांक जारी केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत माहीत दिली.

हेल्पलाईन नंबर

बिहार, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पंजाब, सिक्कीम, तेलंगाना, उत्तराखंड, दादर आणि नगर हवेली, दीव-दमन , लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी येथील नागरिकांनी कोरोना संबधी मदतीसाठी १०४ क्रमांकाचा वापर करावा, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली. मेघालय १०८ आणि मिझोरम १०२ हा क्रमांक मदतीसाठी वापरत आहेत. तर केंद्र सरकारचा हेल्पलाईन नंबर ०११-२३९७८०४६ हा आहे.

या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन नागरिक कोरोना संबधी माहिती घेऊ शकतात. अनेक जण कोरोना विषाणूसंबंधी अफवाही पसरवत आहेत. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी नागरिक या क्रमांकावर फोन करावा. खबरदारी घेण्यासाठी काय करावे, तसेच काही शंका असल्याच या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा.

ABOUT THE AUTHOR

...view details