नवी दिल्ली - कोरोना महामारीचा सामना करताना केंद्र सरकारवरील आर्थिक ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खर्चांमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2021 पर्यंत न वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.
जुलै 2021 पर्यंत महागाई भत्त्यात वाढ न करण्याच केंद्र सरकारचा निर्णय - center govt corona
कोरोना महामारीमुळे सरकारी तिजोरीवर ताण वाढत चालला आहे. त्यामुळे जानेवारी 2020 ते जुलै 2021 पर्यंतचा महागाई भत्ता थांबविण्यात आला आहे.
Breaking News
कोरोना महामारीमुळे सरकारी तिजोरीवर ताण वाढत चालला आहे. त्यामुळे जानेवारी 2020 ते जुलै 2021 पर्यंतचा महागाई भत्ता थांबविण्यात आला आहे. या निर्णयामुळे 2020 21 आणि 2021-22 वित्तीय वर्षात केंद्र सरकारचे 37 हजार 530 कोटींची बचत होणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे 50 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 60 लाख पेन्शन धारकांना महागाई भत्ता मिळणार नाही. राज्य सरकरारेही केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.