महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उज्जैनच्या महाकाल मंदिरात दिवाळी उत्साहात साजरी - mahakal temple ujjain

दिवाळीनिमित्त उज्जैनच्या महाकाल मंदिरात भगवान शंकराला उटणे लावून जलाभिषेक करण्यात आले. पंचामृत अभिषेकानंतर शिवलिंगाचा साज श्रुंगार करून नैवेद्य दाखविला

उज्जैनच्या महाकाल मंदिरात दिवाळी उत्साहात साजरी

By

Published : Oct 28, 2019, 11:35 AM IST

मध्य प्रदेश - देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. उज्जैन मध्ये दिवाळी सणाची सुरूवात बाबा महाकाळच्या मंदिरातून झाली आहे. प्राचीन काळापासून कोणताही सण असेल तर सर्वात आधी महाकाळच्या मंदिरात साजरा करण्याची परंपरा आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱया सहाकाल मंदिरात सकाळ होणाऱ्या भस्म आरतीवेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी बाबा महाकालच्या साक्षीने दिवाळी साजरी केली.

उज्जैनच्या महाकाल मंदिरात दिवाळी उत्साहात साजरी

हेही वाच - राज्यभरात उत्साहात लक्ष्मीपूजन साजरे..

दिवाळीनिमित्त उज्जैनच्या महाकाल मंदिरात भगवान शंकराला उटणे लावून जलाभिषेक करण्यात आले. पंचामृत अभिषेकानंतर शिवलिंगाचा साज श्रुंगार करून नैवेद्य दाखविला. यानंतर भस्म आरती करून दिवाळी साजरी करण्यात आली. यानंतर मंदिर परिसरात फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात भक्तांनी दिवाळीचा आनंद लुटला.

ABOUT THE AUTHOR

...view details