महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदींना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगात मतभेद; आयुक्तांचे स्पष्टीकरण

पंतप्रधान मोदींना निवडणूक आयोगाकडून देणाऱ्या क्लिन चीट संदर्भात आयोगात मतभेद असल्याचे दिसत आहे.

मोदींना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगात मतभेद; आयुक्तांचे स्पष्टीकरण

By

Published : May 18, 2019, 5:32 PM IST

नवी दिल्ली - मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी निवडणूक आयोग असणाऱ्या मतभेदावर होणाऱ्या चर्चावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोणत्याही संस्थेत असे होणे स्वाभाविक आहे. सर्व सदस्यांचे मत एकच असावे हे गरजेचे नाही.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी निवडणूक आयोगचे सदस्य अशोक लवासा यांच्या विषयी प्रसिध्द केलेले निवेदन

माध्यमात निवडणूक आयोगाचे सदस्य अशोक लवासा यांचे वक्तव्य आले आहे. आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यावर अशोक लवासा हे सहमत नव्हते. त्यांच्या मताची दखल घेतली जावी असे त्यांची ईच्छा होती, मात्र असे झाले नाही.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी सांगिलते की, सामान्यपणे अशा गोष्टींची चर्चा बाहेर करणे योग्य नाही. जर एखादा अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्याची मते तो आपल्या पुस्तकात लिहीत असतो. त्यानंतरच काही माहिती बाहेर येते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक लवासा हे नाराज आहेत. त्यामुळे चार मेपासून निवडणूक आचारसंहितेच्या मुद्द्यावरुन होणाऱया बैठकीपासून त्यांनी स्वताला दूर ठेवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details