नवी दिल्ली -सैन्यदलात मनुष्यबळाची कमतरता भासू नये, व कुशल मनुष्यबळाला सैन्यामध्ये अधिकाधिक काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी. या दृष्टीने सैन्यदलात काम करणाऱ्या जवानांचे तसेच तांत्रिक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढवण्याचा विचार असल्याची माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी दिली. निवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सैन्यामध्ये कुशल मनुष्यबळासाठी जवानांचे निवृत्ती वय वाढवण्याचा प्रस्ताव
सैन्यदलात मनुष्यबळाची कमतरता भासू नये, व कुशल मनुष्यबळाला सैन्यामध्ये अधिकाधिक काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी. या दृष्टीने सैन्यदलात काम करणाऱ्या जवानांचे तसेच तांत्रिक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढवण्याचा विचार असल्याची माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी दिली. निवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत
मिळालेल्या माहितीनुसार या प्रस्तावत तीनही दलातील कर्नलपदाच्या अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय 54 वरून 57 करण्यात येणार आहे. तर ब्रिगेडियर्स आणि त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 56 वरून 58 करण्यात येणार आहे. तर लेफ्टनंट जनरलच्या निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात येईल. त्याचप्रमाणे जवानांच्या निवृत्ती वय 57 वर्षांपर्यंत वाढवण्याचा विचार आहे.