नवी दिल्ली - दिल्लीच्या नैऋत्येकडे असलेल्या गोविंदपुरी पोलीस ठाणे क्षेत्रातील तुघलकाबाद येथे हाणामारीचा प्रकार घडला आहे. येथे आई आणि मुलाला काही लोकांनी जोरदार मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. किरकोळ कारणावरून वाद होऊन त्यातून मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आहे.
VIDEO: तुघलकाबाद येथे माय-लोकांना किरकोळ कारणावरून मारहाण - Delhi Crime News
नैऋत्य दिल्लीतील गोविंदपुरीतील तुघलकाबाद परिसरात एका महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या माय-लेकांसमोर काही लोक उभे असल्याचे दिसत आहे. तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये या दोघांना मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे.
ही महिला तुघलकाबाद परिसरात एका ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहत आहे. येथील जिन्यात काही साहित्य ठेवल्याने वाद उद्भवल्याने काही लोकांनी महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण केली. प्राथमिक तपासामध्ये किरकोळ कारणाने संबंधित महिला आणि तिच्या मुलाला जबरदस्त मारहाण केल्याचे दिसत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.