नवी दिल्ली - पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीर घेण्यात आलेली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (सीसीएस) बैठक संपली आहे.या हल्ल्याला मदत करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली म्हटले आहे. त्याबरोबरच भारत राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर बहिष्कार टाकणार असून व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेव्हर्ड' नेशनचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय या बैठकी दरम्यान घेतलाचेही ते म्हणाले.
या बैठकीत जम्मू काश्मीर आणि देशाच्या सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली आहे. पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची बैठक झाली असून या बैठकीला राजनाथ सिंग, निर्मला सितारमण, पियूष गोयल, सुषमा स्वराज आणि इतरही वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.