नवी दिल्ली- कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ यांच्या मृत्यूच्या जवळजवळ एक वर्षानंतर कॉफी डे एंटरप्राइजेस लिमिटेड (सीडीईएल) ने नेमलेल्या समितीने आयकर विभाग व खासगी गुंतवणूकदारांना क्लीन चिट दिली आहे. ही क्लीन चीट व्हर्च्युअल पद्धतीने देण्यात आली.
समितीने दिलेल्या अहवालानुसार आयकर विभाग व खासगी गुंतवणूकदार हे नियमांनुसारच व्ही.जी. सिद्धार्थ यांची चौकशी करत होते.
व्ही.जी. सिद्धार्थ हे 30 जुलै, 2019ला बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह 21 जुलै, 2019ला नेत्रावदी नदीपात्रात आढळला होता. त्यानंतर त्यांचे एक पत्र सापडले होते. त्यात लिहिले होते की, काही खासगी गुंतवणूकदार त्यांच्याकडून घेतलेले शेअर्स म्हणजेच समभाग पुन्हा विकत घेण्यासाठी दबाव घालत होते. तसेच आयकर विभागातील काही अधिकाऱ्यांकडूनही त्यांना त्रास दिला जात असल्याचेही त्यात लिहिले होते. यामुळे सिद्धार्थ यांच्या मृत्यूस तेच जबाबदार असल्याची चर्चा सुरू होती.
याबाबत चौकशी करण्यासाठी सीडीईएलकडून एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने खासगी गुंतवणूकदार व आयकर विभाग हे त्यांचा कायदेशीर काम करत असल्याने त्यांना क्लीन चिट दिली आहे.