नवी दिल्ली - मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी सीबीएसईचा दहावीचा निकाल उद्या (15 जुलै) लागणार असल्याचे जाहीर केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर अखेर पर्यायी मूल्यांकन व्यवस्थेचा अवलंब करून निकाल देणार असल्याचे पोखरियाल यांनी सांगितले.
अखेर दहावीचा निकाल लागणार... सीबीएसईने जाहीर केली तारीख!
मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी सीबीएसईचा दहावीचा निकाल उद्या (15 जुलै) लागणार असल्याचे जाहीर केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर अखेर पर्यायी मूल्यांकन व्यवस्थेचा अवलंब करून निकाल देणार असल्याचे पोखरियाल यांनी सांगितले.
अखेर दहावीचा निकाल लागणार....सीबीएसई बोर्डाने जाहीर केली तारीख!
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळांच्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या (१५जुलै) लागणार आहे. मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी संबंधित घोषणा केली आहे. सीबीएसईने सोमवारी (१३ जुलै) बारावीचे निकाल जाहीर केले होते. याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. मात्र आता केंद्रीय मंत्र्यांनी याबाबत ट्वीट केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना रिझल्ट्साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदा पर्यायी मूल्यांकन पद्धतीनुसार निकाल
बारावीच्या परीक्षा पुढे ढकलून जुलै महिन्यात पूर्वनियोजित करण्यात आल्या. तसेच दिल्लीतील दंगलींमुळे दहावीच्या परीक्षा देखील रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दोन्ही परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर उद्या पर्यायी मूल्यांकनावर निकाल जाहीर होणार आहेत.
Last Updated : Jul 14, 2020, 4:01 PM IST