नवी दिल्ली - विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेनंतर सीबीएसईच्या पुरवणी परीक्षेचा (कम्पार्ट एक्झाम) प्रश्नही सर्वोच्च न्यायालयात पोहोचण्याची शक्यता आहे. देशभरातील 800 विद्यार्थ्यांनी पत्र लिहून सीबीएसई परीक्षेच्या पुरवणी परीक्षेबाबत सू मोटोने निर्णय घेण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे.
ऑल इंडिया स्टुंडस असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव संदीप गौरव यांनी सीबीएसईच्या 809 विद्यार्थ्यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिले आहे. देशभरात कोरोनाचे संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने सीबीएसईचे विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांना धोका आहे. त्यामुळे सीबीएसईच्या पुरवणी परीक्षेबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती संदीप गौरव यांनी सर्वोच्च न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात केली आहे.