नवी दिल्ली -कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 9 वी ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात घोषित केली आहे. अनेकांनी या कपातीचा विरोध केला असून नाराजी व्यक्त केली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. ही कपात फक्त 2020 ते 21 या शैक्षणिक सत्रासाठी वैध आहे, असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रक जारी करून म्हटले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सीबीएसईने शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये 9 ते 12 वी पर्यंत अभ्यासक्रमात 30 ट्क्के कपात केली आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात अधिक तणाव नसू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 2020-21 च्या परिक्षामध्ये कपात केलेल्या अभ्यासक्रमातून प्रश्न विचारण्यात येणार नाहीत, असे सीबीएसई सचिव अनुराग त्रिपाठी यांनी सांगितले.