नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी www.results.nic.in आणि www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. याशिवाय विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमधून तसेच डिजिलॉकरमधूनही आपली गुणपत्रिका पाहता येणार आहे.
सीबीएसई बोर्डाच्या दहावीचे तब्बल १८ लाख विद्यार्थ्यी निकालाच्या प्रतीक्षेत होते. मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाच्या तारखेची माहिती दिली होती. निशंक त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, माझे प्रिय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल बुधवारी (ता. १५) जाहीर केले जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा.
सीबीएसई परिक्षेत पुणे विभागाचा निकाल ९८.५ टक्के लागला आहे. तर या यादीत त्रिवेंद्रम ९९.२८ टक्केसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.