नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या चार मेपासून सुरू होणार आहेत.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी २८ जानेवारीला एका कार्यक्रमात सांगितले होते, की २ फेब्रुवारीला दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यत येईल. त्यानुसार आज सायंकाळी पाचच्या सुमारास याबाबत माहिती देण्यात आली.
४ मे ते १० जून असणार परीक्षा..
पोखरियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे ते १० जून या कालावधीत पार पडणार आहेत. तसेच, प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहेत. या परिक्षांचे निकाल १५ जुलैपर्यंत या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येतील असेही पोखरियाल यांनी स्पष्ट केले.
अभ्यासक्रमात ३० टक्के कपात..
कोरोना महामारीमुळे देशातील जवळपास सर्व व्यवहार ठप्प झाला होता. यामुळेच शाळा आणि महाविद्यालयेही काही महिने बंद होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, तरीही विद्यार्थ्यांवर जास्त ताण येऊ नये यासाठी अभ्यासक्रमामध्ये ३० टक्के कपात करण्यात आली आहे.
हेही वाचा :यूजीसी-नेटच्या तारखा जाहीर; २ ते १७ मे दरम्यान होणार परीक्षा