नवी दिल्ली - सप्टेंबर २०२० मध्ये सीबीएसई १० वी आणि १२ वीच्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. याविषयी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) औपचारिकरित्या एक अधिसूचना जारी केली आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षांविषयी यामध्ये तपशील देण्यात आला आहे. सीबीएसई विभागीय परीक्षा २०२० कोविड - १९ मुळे स्थगित किंवा रद्द करण्यात आल्याचे सर्व अंदाज आणि अफवांना पूर्णविराम देण्यासाठी मंडळाने नुकतीच ही अधिसूचना औपचारिकरित्या जारी केली आहे.
बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, सीबीएसई १० वी आणि १२ वीच्या विभागीय परीक्षा सप्टेंबर २०२० मध्ये घेण्यात येणार आहेत. खासगीरित्या ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना cbse.nic.in. वर लॉग इन करून ऑनलाइन नोंदणी करता येईल. किंवा हे विद्यार्थीही सीबीएसईच्या १० वी आणि १२ वी परीक्षा २०२० च्या अर्जासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकतात.
http://cbse.nic.in/newsite/private/index.html
परीक्षा सप्टेंबरमध्ये, लवकरच विषयवार तारखा जाहीर होणार
सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, सीबीएसई बोर्डाची १० वी आणि १२ वी २०२० ची विभागीय परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. आत्तापर्यंत मंडळाने केवळ तात्पुरती तारीख जाहीर केली आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विभागीय परीक्षा २०२० मध्ये प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीसह विभागीय परीक्षेच्या सविस्तर विषयवार तारखा लवकरच मंडळामार्फत अधिसूचनेमार्फत कळविल्या जातील, असे यात नमूद केले आहे.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२०
सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विभागीय परीक्षा २०२० च्या अर्जांची प्रक्रिया १३ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ती २० ऑगस्ट २०२० पर्यंत सुरू राहील. २२ ऑगस्ट २०२० पर्यंत उशिरा फी भरून अर्ज करता येतील. विद्यार्थ्यांना सीबीएसई विभागीय परीक्षा २०२० साठी सहजपणे अर्ज करता यावा, यासाठी ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली गेली आहे. विद्यार्थी वर दिलेल्या लिंकद्वारे थेट अर्जावर लॉग इन करू शकतात.