महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हाथरस प्रकरण : आरोपींच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम अलीगढ कारागृहात - सीबीआयची टीम अलीगढ कारागृहात

हाथरस प्रकरणातील आरोपींची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम जिल्हा कारागृहात पोहचली. उत्तर प्रदेश सरकारने हाथरस अत्याचार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केंद्र सरकारला केली होती. त्यानंतर, केंद्राच्या सूचनेनुसार सीबीआयने हे प्रकरण हाती घेतले.

हाथरस प्रकरण
हाथरस प्रकरण

By

Published : Oct 19, 2020, 5:30 PM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरस बलात्कार प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवला असून आरोपींची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम जिल्हा कारागृहात पोहचली. सीबीआयच्या दुसऱ्या टीमने जे.एन. वैद्यकीय रुग्णालयात पीडितेवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांची चौकशी केली. हाथरस आरोपी सध्या अलीगढ कारागृहात आहेत.

सीबीआयने यापूर्वी घटनेचा प्रत्यक्षदर्शी, पीडितेच कुटुंब, यांची चौकशी केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने हाथरस अत्याचार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केंद्र सरकारला केली होती. त्यानंतर, केंद्राच्या सूचनेनुसार सीबीआयने हे प्रकरण हाती घेतले. सीबीआय पथकाने बुलगढी गावातील घटनास्थळाला भेट दिली होती. तसेच पीडितेच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवला होता.

हाथरस प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू

हाथरस प्रकरण नीट हाताळले नसल्याचा आरोप योगी सरकारवर होत आहे. तसेच पोलीस आणि प्रशासनाने मीडिया आणि विरोधी पक्षाशी अरेरावी केल्यावरूनही योगी सरकार टीकेचे धनी बनले होते. पीडितेचा 29 सप्टेंबरला मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांच्या परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. तसेच राजकीय नेते आणि माध्यमांना हाथरस जिल्ह्यात येण्यास बंदी घातली होती. कायदा सुव्यवस्थेचे कारण प्रशासनाने पुढे केले होते. तसेच जिल्ह्यात आणि पीडितेच्या गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाने आम्हाला दम दिल्याचा आरोपही पीडित कुटुंबियांनी केला होता.

14 सप्टेंबरला चंदपा पोलीस स्टेशनअर्तंगत असलेल्या हाथरसमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. आरोपीने पीडितेला मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. या तरुणीचा उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details