महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सात हजार कोटींची बँक फसवणूक प्रकरणे; सीबीआयचे तब्बल १६९ ठिकाणी छापे! - सीबीआय छापे

केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आज मोठी कारवाई करत आहे. बँकांच्या फसवणुकीसंदर्भात सीबीआय आज देशभरात १६९ ठिकाणी छापा मारत आहे. यासंदर्भात एकूण ४२ खटले नोंदवले आहेत. या सर्व खटल्यांमध्ये मिळून तब्बल ७,२०० कोटींची फसवणूक झाली आहे.

CBI news today

By

Published : Nov 5, 2019, 5:23 PM IST

Updated : Nov 5, 2019, 7:27 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आज मोठी कारवाई करत आहे. बँकांच्या फसवणुकीसंदर्भात सीबीआय आज देशभरात १६९ ठिकाणी छापा मारत आहे.

आंध्र प्रदेश, चंदीगढ, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दादरा आणि नगर हवेली या सर्व राज्यांमध्ये विविध ठिकाणी हे छापे मारण्यात आले.

सीबीआयने बँक फसवणूकीसंदर्भात एकूण ४२ खटले नोंदवले आहेत. या सर्व खटल्यांमध्ये मिळून तब्बल ७,२०० कोटींची फसवणूक झाली आहे. यामधील बँकांची नावे जाहीर करण्यास मात्र सीबीआयने नकार दिला आहे.
Last Updated : Nov 5, 2019, 7:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details