नवी दिल्ली - पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि चंदीगड या राज्यांमधील विविध २२ शैक्षणिक संस्थांवर सीबीआयकडून छापे टाकण्यात आले. येथे शिष्यवृत्तीशी संबंधित कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा संशय आहे.
सीबीआयचे २२ शैक्षणिक संस्थांवर छापे; कोट्यवधींचा शिष्यवृत्ती घोटाळा झाल्याची शक्यता - himachal pradesh
यामध्ये एसी, एसटी, ओबीसी आणि मागासवर्गीय शिष्यवृत्तींचा समावेश आहे. यामध्ये जवळपास २५० कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती सीबीआय प्रवकत्याने दिली.
CBI
शिष्यवृत्तीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी अज्ञात अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर छापे टाकण्यात आले. यामध्ये एसी, एसटी, ओबीसी आणि मागासवर्गीय शिष्यवृत्तींचा समावेश आहे. यामध्ये जवळपास २५० कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती सीबीआय प्रवकत्याने दिली.
तसेच विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणारा शिष्यवृत्तीचा निधी दुसऱ्याच व्यक्तींच्या खात्यात जमा करण्यात आला असल्याचेही सांगण्यात येत आहे.