नवी दिल्ली - आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरणी पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तत्काळ जामिनावर निर्णय घेतला नाही. दरम्यान सीबीआयने चिदंबरम यांच्या विरोधात 'लुकआऊट नोटीस' नोटीस जारी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. न्यायालयाच्या मुख्य न्यायधिशांच्या समोर हे प्रकरण ठेवले जाईल, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी सीबीआय किंवा ईडी( सक्तवसुली संचलनालय) ताब्यात घेवू शकते.
चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर सीबीआयने देखील न्यायालयात (कॅव्हेट) याचिका दाखल केली आहे. सुनावणीवर निर्णय घेण्यापूर्वी सीबीआयची देखील बाजू एकून घेतली जावी, अशी विनंती सीबीआयने न्यायालयाला केली आहे.