नवी दिल्ली - आयएनएक्स माध्यम कथित गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची सीबीआय कोठडी आज (शुक्रवार) समाप्त होणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणाची शक्यता आहे. मात्र, काँग्रेस नेते चिंदबरम यांनी दोन सप्टेंबरपर्यंत कोठडीत राहण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या याचिकेवर ५ सप्टेंबरला निर्णय देण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणात चिदंबरम यांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदत येत्या गुरुवापर्यंत म्हणजे ५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.
हेही वाचा - आयएनएक्स प्रकरण : आरोपांशी संबंधित पुरावे गोळा करा, चिदंबरम कुटुंबीयांचे सरकारला आव्हान