गांधीनगर - इशरत जहां बनावट चकमक प्रकरणातील आरोपी माजी पोलीस अधिकारी डी. जी. वंजारा आणि एन. के. अमिन यांची विशेष सीबीआय न्यायालाने निर्दोष मुक्तता केली आहे. गुजरात सरकारकडून दोन्ही अधिकाऱयांविरोधात खटला चालवण्याची परवानगी न मिळाल्यानंतर दोघांनी दोषमुक्त करण्याचे निवेदन दिले होते.
गुजरात सरकारने खटला चालवण्याची परनवानगी न दिल्यामुळे दोघांची विनंती मान्य करण्यात येत आहे, असे सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधिश जे. के. पांड्या यांनी निर्वाळा देताना म्हटले. भारतीय दंड विधानाची कलम १९७ अतंर्गत कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने कर्तव्याबाबत खटला चालवण्यासाठी सरकारची मंजूरी मिळणे आवश्यक असते, असे त्यांनी म्हटले.