नवी दिल्ली– केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दिल्लीच्या तीन पोलिसांना रंगेहात जाळ्यात पकडले आहे. अटकेमध्ये विजय विहार पोलीस स्टेशनचा एसएचओ आणि दोन पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश आहे. या पोलिसांवर तक्रारदाराकडून दोन लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
दिल्लीच्या 3 लाचखोर पोलिसांना सीबीआयकडून रंगेहाथ अटक - लाचखोर दिल्ली पोलीस न्यूज
विहार पोलीस स्टेशनचे अधिकारी एस. एस. चहल, पोलीस कॉन्स्टेबल बद्री आणि जितेंद्र अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री अटक केली आहे.

विहार पोलीस स्टेशनचे अधिकारी एस. एस. चहल, पोलीस कॉन्स्टेबल बद्री आणि जितेंद्र अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. तिन्ही आरोपीही तक्रारदाराकडून 5 लाख रुपयांची लाच मागत होते.
तक्रारदार हा खुल्या प्लॉटभोवती कुंपणासाठी भिंत बांधत होता. त्यावर काही लोकांनी मालकी हक्क असल्याचा दावा केला होता. हा वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्यावेळी स्टेशन हाऊसिंग ऑफिसरने (एसएचओ) तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर त्यामध्ये तडजोड करत तक्रारदाने दोन लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. तक्रारदाराने हा प्रकार सांगताच सीबीआयने सापळा रचून लाचखोर पोलिसांना रंगेहात अटक केली आहे.