महाराष्ट्र

maharashtra

करदात्यांना दिलासा; प्राप्तिकर परताव्यासाठी मुदत वाढवली

By

Published : Jul 24, 2019, 8:07 PM IST

अगोदर निर्धारित केलेली ३१ जुलै ही तारीख वाढवून आता ३१ ऑगस्ट केली आहे. प्राप्तिकर विभागाने याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती दिली आहे.

करदात्यांना दिलासा

नवी दिल्ली - केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ने आज प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) फाइल करण्यासाठी अगोदर निर्धारित केलेली ३१ जुलै ही तारीख वाढवून आता ३१ ऑगस्ट केली आहे. प्राप्तिकर विभागाने याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती दिली आहे.

प्राप्तिकर विवरणपत्र फाइल करण्याच्या ३१ ऑगस्ट या अंतिम तारखेनंतर दंड देखील द्यावा लागू शकतो. आयटीआर प्रत्येकवर्षी फाइल करणे बंधनकारक आहे. आयटीआर फाइल केला नाहीतर आयकर विभागाकडून नोटीस अथवा दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अंतिम तारखेच्या आतच आयटीआर फॉर्म फाइल करणे फायद्याचे राहणार आहे. यासाठी फॉर्म १६ आणि पॅन कार्डसारख्या अन्य कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रीटर्न फाइल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाइल करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे याची मुदत वाढवण्याची मागणी होत होती.

ABOUT THE AUTHOR

...view details