पटना -ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात छपरा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष अभिमन्यू कुमार सिंह यांनी आपले वकील मनोज सिंह यांच्या मार्फत ही तक्रार दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी निकाल जाहीर केल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अयोध्या प्रकरणी विवादास्पद वक्तव्य केल्यामुळे ओवैसी गोत्यात, बिहारमध्ये तक्रार दाखल.. यासोबतच, ओवैसींविरोधात राजद्रोह आणि धर्माच्या आधारावर लोकांना भडकवण्याबाबतही गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. अभिमन्यू कुमार सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात हैदराबादचे खासदार असलेल्या ओवैसींवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करणे, एका विशिष्ट समाजाच्या लोकांना उकसवणे आणि दुसऱ्या समाजातील लोकांच्या भावना दुःखावणे अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत.
अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष अभिमन्यु कुमार मनोज सिंह यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला आपला निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर, आमसभेत आणि सार्वजनिकरित्या ओवैसींनी या निर्णयाविरोधात वक्तव्ये करत, सामान्य जनतेच्या धार्मिक भावनांना दुःखावले आहे. यासोबतच त्यांनी दोन समाजांमधील लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. ओवैसींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केलेले वक्तव्य, हे राष्ट्रद्रोहाच्या परिभाषेत गणले जाते. त्यामुळे भारतीय दंड संहितेतील कलम १२४ अ, २२५ अ, ५०५ अब (२) आणि ६६ अ आयटी कायदा या कलमांतर्गत खटला दाखल केला गेला आहे.
हेही वाचा :सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात गेल्याबद्दल ओवैसींविरुद्ध तक्रार दाखल..