लखनौ - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनात झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी 1 हजार विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटलेली नाही.
सीएए आंदोलनात हिंसा: अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील 1 हजार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल - सीएए आंदोलन एएमयू
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनात झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी 1 हजार विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
१५ ऑक्टोबरला अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला होता. तसेच अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी अरेरावी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात उत्तरप्रदेशात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. यामध्ये १७ ते १८ जणांचा मृत्यूही झाला आहे. हिंसा पसरवणाऱ्या लोकांची संपत्ती जप्त केली जाईल, असे याआधीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार कारवाईही करण्यात आली आहे. राज्यातील अनेक संवेदनशील स्थळी अजूनही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.