हैदराबाद -कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये येत्या 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे हैदराबाद पोलिसांनी काँग्रेस ज्येष्ठ नेते व्ही. हनुमंता राव यांच्या विरोधात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाऊनचे उल्लघंन... हैदराबादमध्ये काँग्रेस नेत्याविरोधात गुन्हा दाखल - काँग्रेस ज्येष्ठ नेते व्ही. हनुमंता राव
हैदराबाद पोलिसांनी काँग्रेस ज्येष्ठ नेते व्ही. हनुमंता राव यांच्या विरोधात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
व्ही. हनुमंता राव यांनी मंगळवारी आपल्या कार्यकर्त्यासह नियमांचे उल्लघंन केले. त्यांनी एकत्र जमा होत, आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी त्यांनी तिथे तैनात असलेल्या पोलिसांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि पोलिसांशी वाद घातला. यामुळे सेफाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मंगळवारी देशभरात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. भिमराव(बाबासाहेब) आंबेडकरांची १२९वी जयंती साजरी झाली. देशात कोरोनाचे संकट असल्यामुळे सर्वांनी जयंती आपल्या घरात बसून साजरी केली. बाबासाहेबांवर कविता, लेख लिहून शेअर केले करून यंदाची जयंती ऑनलाईन साजरी झाली.
TAGGED:
व्ही. हनुमंता राव