हैदराबाद -भडकाऊ वक्तव्ये करून दोन धर्मामध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी, एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण आणि भाजप नेते कपिल मिश्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बालकिशन राव नामदारी यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
असदुद्दीन ओवैसी,वारिस पठाण अन् कपिल मिश्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल
खासदार असदुद्दीन ओवैसी, एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण आणि भाजप नेते कपिल मिश्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Case registered against Asaduddin Owaisi Waris Pathan & BJP leader Kapil Mishra
असदुद्दीन ओवैसी, एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण आणि भाजप नेते कपिल मिश्रा 'जी गोष्ट मागून मिळत नाही, ती गोष्ट आपल्याला हिसकाऊन घ्यावी लागणार आहे. आम्ही केवळ १५ कोटी आहोत, मात्र १०० कोटींच्याही वरचढ ठरू, हे लक्षात ठेवा', असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी केले होते. तर भाजप नेत कपिल मिश्रा यांनी सीएए विरोधी आंदोनलावर वादग्रस्त वक्तव्ये केले होते.