जयपूर (राजस्थान) - प्रवचनकार मुरारी बापू यांच्या विरोधात श्रीकृष्णाबाबत अपशब्द वापरल्यामुळे कालवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर यांच्या एका प्रवचनाचा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी श्रीकृष्ण त्यांचे वडीलबंधू बलदेवयांसह कुटुंबियांवर टीका केली होती.
श्रीकृष्णाबाबत अपशब्द वापरणाऱ्या प्रवचनकार मुरारी बापूंविरोधात गुन्हा दाखल - rajsthan news
प्रवचनकार मुरारी बापू यांच्या विरोधात श्रीकृष्णाबाबत अपशब्द वापरल्यामुळे जयपूरच्या (राजस्थान) कालवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवचनकार मोरारी बापू
यानंतर यास हिंदू समाजातील अनेक धर्मगुरुंनी मोरारी बापूच्या विरोधात टिकेची झोड उठवली होती. याप्रकरणी मुरारी बापूनी माफी मागावी, अशी मागणीही केली होती. जयपूर येथील संत सौरभ आचार्य महाराज यांनी प्रवचनकार मुरारी बापू यांच्या विरोधात हिंदू धर्माला मानणाऱ्या सर्व भक्तांच्या धार्मिक आणि अध्यात्मिक भावना दुखावल्याची तक्रार कालवाड पोलीस ठाण्याती दिली आहे. या तक्रारीवरून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा -सात महिन्यांची गर्भवती कमांडो देत होती नक्षलविरोधी लढा, गोंडस मुलीला दिला जन्म
Last Updated : Jun 8, 2020, 9:38 AM IST