नवी दिल्ली - बिहारमध्ये चमकी (मेंदूज्वार) या आजारामुळे आतापर्यंत १०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला जबाबदार धरत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांच्याविरूद्ध खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुझफ्फरपूरमध्ये 'चमकी' बळींचा आकडा १०० वर, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसह बिहारच्या आरोग्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार दाखल - बिहार
न्यायालयाने या प्रकारणाच्या सुनावणीसाठी २४ जून ही तारीख दिली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह बिहारच्या आरोग्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल
तमन्ना हाशमी या सामजिक कार्यकर्त्यीने वरिल दोन्ही मंत्र्यांविरूद्ध तक्रार दिली होती. याप्रकरणी मुझफ्फरपूर न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकारणाच्या सुनावणीसाठी २४ जून ही तारीख दिली आहे.