भोपाळ- मध्यप्रदेशात कार आणि ट्रकच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बरवाणी जिल्ह्यातील मंदवाडा येथे घडली. विवाह सोहळ्याला जात असताना हा अपघात झाला.
मध्यप्रदेश: विवाह सोहळ्याला जाताना कारला अपघात, एकाच कुटुंबातील ५ जण ठार - car truck accident mp
मध्यप्रदेशात कार आणि ट्रकच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. विवाह सोहळ्याला जात असताना कारमधील एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला.
![मध्यप्रदेश: विवाह सोहळ्याला जाताना कारला अपघात, एकाच कुटुंबातील ५ जण ठार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5090919-953-5090919-1573971357217.jpg)
अपघातग्रस्त कार
अपघातात एक लहान मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त ट्रकमधून पोकलेन नेण्यात येत होते. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे. अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला आहे. मंदवाडा पोलीस क्षेत्रामध्ये हा अपघात घडला.
Last Updated : Nov 17, 2019, 12:08 PM IST