बंगळुरु -कर्नाटकातील बेंगळुरूच्या एचएसआर लेआऊट परिसरामध्ये रविवारी एक वेगवान कार फुटपाथशेजारी असलेल्या दुकानात घुसली. या अपघातात कमीतकमी सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
बंगळुरुमध्ये वेगवान कारची पादचाऱ्यांना धडक; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - कार फुटपाथवर आल्याने गंभीर अपघात
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये रविवारी रात्री एका वेगवान कारने फुटपाथवरील पादचाऱ्यांना धडक दिल्याने आठ पादचारी गंभीर जखमी झाले आहेत.
बंगळुरुमध्ये वेगवान कारने दिली पादचाऱ्यांना धडक
बंगळुरुच्या एचएसआर लेआउट भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानासमोर असलेल्या पादचाऱ्यांना एका वेगवान कारने धडक दिली. ही संपूर्ण घटना जवळच्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. फुटेजमध्ये लोक चहा घेत असल्याचे दिसत आहे, तर काही लोक पदपथावरून चालताना दिसत आहे.