देहराडून - उत्तराखंडमधील देवप्रयाग येथे २०० फूट खोल दरीत कार कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ऋषीकेश-देवप्रयाग मार्गावर झाली. २०० मीटर दरीमध्ये कार कोसळल्याने ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
उत्तराखंड: देवप्रयागमध्ये कार दरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर - car accident uttarakhand
उत्तराखंडमधील देवप्रयाग येथे कार दरीमध्ये कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
कार दरीत कोसळली
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले, तसेच जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Last Updated : Jan 16, 2020, 2:38 PM IST