हैदराबाद- दुभाजकावर आदळून भरधाव कार भरतनगर येथील उड्डाणपुलावरून खाली पडल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत कार चालकाचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहे. जखमींना गांधी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
हैदराबाद येथे उड्डाणपुलावरून भरधाव कार कोसळली; एकाचा मृत्यू, ५ जण जखमी - car accident hyderabad
भरतनगर येथील उड्डाणपुलावरूण भरधाव कार खाली पडल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत कार चालकाचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले. जखमींना गांधी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
कार अपघात
ही कार इर्रागड्डा येथून मुसापेठ येथे चालली होती. दरम्यान, २.५० च्या सुमारास ही भराधाव कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकली आणि उड्डाणपुलाखाली पडली. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहे, असे सनतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन रेड्डी यांनी सांगितले. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध इंडियन पिनल कोड आणि आयपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 18, 2020, 12:06 PM IST